March 30, 2026

हवेली ज्ञानेश्वर पाटेकर 

 
     आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, शिववृत्त पोलीस मित्र
माहिती अधिकार   संरक्षण सेना, भारतीय महाक्रांती सेना आयोजित सामाजिक,
शैक्षणिक  प्रशासकीय सेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींसाठी
महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय सन्मान सोहळा 2022 चे आयोजन शनिवार दिनांक २3
जुलै रोजी दुपारी 12- 30 वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले
रोड पुणे येथे करण्यात आले आहे,                  

सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे 
व उल्लेखनीय कार्य  करणारे हवेली तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष
श्रीकांत सुभाष पाटोळे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात झाली असून सर्व
स्तरातून श्रीकांत पाटोळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे     

कार्यक्रमाचे
निमंत्रक संस्थापक अध्यक्ष डॉ.अविनाश सकुंडे असून कार्यक्रमाचे आयोजन
पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास पठारे व प्रसिद्धी प्रमुख
सतीश राठोड व स्नेहा कुलकर्णी यांनी केले आहे,