शंकररावजी गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
सुनील भंडारे पाटील
अहिल्यानगर पांढरी पुल येथील स्वामी कृपा क्लिनिक मध्ये शंकररावजी गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
या आरोग्य शिबिरामध्ये मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, टाचदुखी, सांधेदुखी त्याचप्रमाणे पॅरालिसिस सारख्या गंभीर आजारावर उपचार व मार्गदर्शन करण्यात आले,
यावेळी 28 पेशंट वर फिजिओथेरपी उपचार करण्यात आले, उपचारांमध्ये फिजिओथेरपी, बोन सेटिंग, कॅपिंग थेरपी, मसल रिलॅक्सेशन, मॅट्रिक्स थेरपी, रिदम थेरपी आदी उपचारांचा समावेश होता,
याप्रसंगी स्वामी कृपा क्लिनिकचे डॉक्टर शरद कुऱ्हाडे, नाथ हॉस्पिटल व नर्सिंग केअरचे डॉक्टर अक्षय कुऱ्हाडे, डॉक्टर अजिंक्य आठरे, व या दोन्ही हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते,
गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचा अनेकांना फायदा मिळाल्यामुळे सर्वांनीच आयोजकांचे आभार मानले,
![]()
