शिक्रापुरात नदीकाठी सोडले नवजात बालक
शिक्रापूर पोलीस व पत्रकाराच्या सतर्कतेने बालकाला नवजीवन
शिक्रापूर प्रतिनिधी संदीप ढाकुलकर
शिक्रापूर ता. शिरुर येथील वेळ नदी काठी अज्ञाताने नवजात बालक सोडून दिल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस व स्थानिक पत्रकाराच्या सदर बालकावर उपचार होऊन बालकाला नवजीवन मिळाले आहे.
शिक्रापूर येथील वेळ नदीच्या कडेला सुरेशराव करंजे हे पूजेसाठी गेले असता त्यांना एक बेवारस बाळ नदीच्या कडेला सोडले असल्याचे दिसून आले, याबाबतची माहिती सचिन करंजे यांनी शेरखान शेख यांना देताच त्यांनी सदर माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना देत मिनाक्षी करंजे यांच्या मदतीने सदर बालकाला शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले,
दरम्यान पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, पोलीस हवलदार उद्धव भालेराव, आत्माराम तळोले, महिला पोलीस हवालदार उज्वला गायकवाड, किरण निकम यांनी रुग्णालयात धाव घेतली, वैद्यकीय अधिकारी डॉ. शहाजी कदम, डॉ. पराग कानडे, डॉ. मान्या मिश्रा, प्रिया जाधव – ढगे, वैभवी शेळके, सारिका वाळकोळी, मांडवी मिंदाणे, कांचन गुल्हाणे, आरोग्य सेविका कल्पना ढोकले, सोनल मोरे यांनी बालकावर उपचार केले,
तर शिक्रापूर पोलिसांच्या मदतीने सदर बालकाला बालकल्याण समितीच्या माध्यमातून पुणे येथील संस्थेत दाखल करण्यात आले असून, याबाबत बोलताना घडलेल्या घटनेबाबत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून बालकाला भारतीय समाज सेवा संस्थेमध्ये दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर येथील नदीमध्ये मिळालेले बालक ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालयात घटनेची माहिती समजताच उपस्थित रुग्णालयात कर्मचारी व पोलीस देखील बाळाला पासून गहिवरून गेले.
शिक्रापूर पोलिसांनी सदर बालकाला पुण्यामध्ये दाखल करण्यासाठी नेताना चक्क पोलिसांच्या वाहनाला सजवून त्या वाहनातून बालकाला नवीन कपडे व वस्तू घेऊन पुण्यात दाखल केल्याने खाकीतील माणुसकी देखील दिसून आली.
शिक्रापूर येथील पत्रकार व सर्पमित्र शेरखान शेख यांनी सकाळी रुग्णालयात आणलेले अज्ञात बालक हे पुरुष वर्गातील व पूर्णपणे सुदृढ असून त्याला पोलिसांच्या माध्यमातून पुण्यातील संस्थेत दाखल करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शहाजी कदम यांनी सांगितले.
![]()
