March 30, 2026
धक्कादायक…! वढू बुद्रुक येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धक्कादायक…! वढू बुद्रुक येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

भरारी न्युज वृत्तसेवा 

वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथे एका अल्पवयीन मुलीशी ओळख करून मैत्री वाढवत वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी भेटून बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली असून मुलीच्या नातेवाईकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे,

याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार युवतीचे पोट दुखू लागले म्हणून तिच्या नातेवाईकांना कोरेगाव भीमा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय तपासनीनंतर सदर युवती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले,

या सर्व घटनेचा उलगडा होताच युवतीच्या कुटुंबीयांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता, युवतीने घडलेला सर्व प्रकार सांगितला, त्यानंतर पीडित अल्पवयीन युवतीने व तिच्या नातेवाईकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून पोलिसांनी रोहन अनिल पाटसकर वय 27 वर्ष राहणार फुलगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे, याच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार व इतर गुन्हे दाखल केले असून आरोपी रोहन पाटसकर याला अटक करण्यात आली आहे, पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मस्कर करत आहेत,

Loading