स्वारगेट पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील तडीपार ताब्यात ; गुन्हे शाखा युनिट 2 ची धडाकेबाज कारवाई
सुनील भंडारे पाटील
गुन्हे शाखा युनिट 2 कडील पो हवादार संदीप शिर्के, पो हवादार विशाल दळवी, पो अंम ऋषीकेश व्यवहारे असे यूनिट हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना संदीप शिर्के व ऋषीकेश व्यवहारे यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, स्वारगेट पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू वय 35 रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे हा अथर कंपनी समोर, डायस प्लॉट येथे फुटपाथवर थांबला आहे,
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यास पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याचे अभिलेख तपासले असता त्याचेवर स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे येथे जुगार कायद्या अंतर्गत एकूण 12 गुन्हे नोंद असून त्यास पोलीस उप आयुक्त झोन 2 पुणे शहर यांनी 02 वर्षांकरिता तडीपार केले होते.
तरी आज रोजी तो मिळून आल्याने त्याचेविरुद्ध स्वारगेट पो स्टे येथे गू र नं – 119/2026 म पो का क 142 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करुन पुढील तपास कामी स्वारगेट पोलीस ठाणे यांचे स्वाधीन केले आहे.
सदरची कामगिरी सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहा पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, संदीप शिर्के, विशाल दळवी, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, ऋषीकेश व्यवहारे, सद्दाम तांबोळी यांचे पथकाने केलेली आहे.
![]()
