March 30, 2026
मुळा मुठा नदीत सोडले जाणारे केमिकल युक्त पाणी बंद करणे व जलपर्णी नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

मुळा मुठा नदीत सोडली जाणारे केमिकल युक्त पाणी बंद करणे व जलपर्णी नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

सुनील भंडारे पाटील

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पूर्वपट्टीमध्ये मुळा मुठा नदीत केमिकल युक्त ड्रेनिज सांडपाणी सोडल्याने नागरिकाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात कांजवन वनस्पतीचा थर निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे, आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नदीची साफसफाई व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण छेडले आहे,

परिसरातून केमिकल व ड्रेनेज सांडपाणी सतत नदीमध्ये सोडल्याने नदीचे पाणी दूषित झाली आहे , यासंदर्भात नदीकाठच्या गावांमधील असंख्य शेतकऱ्यांनी या विरोधात लढा चालू केला असून शेतकरी कृती समितीच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना लेखी स्वरुपात निवेदन देण्यात आले आहे, दूषित पाण्यामुळे नदीपात्रामध्ये जलपर्णी वनस्पतीचा दाट हिरवा थर तयार झाला आहे,

त्यामुळे पशुधन जनावरे याच्या जिवालाही धोका निर्माण झाल्यामुळे पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी संचालक कृष्णा खोरे सिंचन भवन पुणे ,आयुक्त पुणे महानगर पालिका ,आयुक्त पिंपरी चिंचवड महानगर पालिका ,जिल्हाधिकारी पुणे, विभागीय आयुक्त पुणे, आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्याकडे 16 एप्रिल 2026 रोजी लेखी स्वरुपात निवेदन देण्यात आले होते ,

त्यानुसार नदीकाठचा नागरिकांनी मुळा मुठा नदीपात्रात जलपर्णी वर बसून आमरण उपोषणाला सुरवात केली आहे ,सदर प्रसंगी आसपासच्या अनेक गावच्या प्रतिनिधींनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे,

शेतकऱ्यांना व आसपासच्या गावांना सरळ पाईपलाईन द्वारे पाणी द्यावे, नदीतील पाणी शुद्धीकरण करावे, जलपर्णी हटवण्यासाठी उपाययोजना करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केले आहेत,

तसेच शासनाने तातडीने योग्य न्याय देण्यासाठी पाऊले उचलावी जोपर्यंत शासन स्थरावर या विषयाचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे, अशी माहिती हिंगणगावचे माजी सरपंच अंकुश कोतवाल यांनी दिली आहे,

Loading