March 30, 2026
तुळापूर मध्ये बैलांचा गोठा पेटला दोन बैल एक घोडीला अग्नि समाधी शेतकऱ्याचे मोठे नुकसान 

तुळापूर मध्ये बैलांचा गोठा पेटला दोन बैल एक घोडीला अग्नि समाधी शेतकऱ्याचे मोठे नुकसान

पुणे जिल्ह्यातील तुळापूर तालुका हवेली येथील शेतकरी व बैलगाडा शौकीन मालक पोपट राजाराम शिवले यांच्या जनावराच्या गोठ्याला आज पहाटे अचानक आग लागल्याने गोठ्यात बांधलेले बैलगाडा शर्यतीमधील दोन बैल व एक घोडी संपूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी येऊन ठार झाल्याची दुःखद घटना घडली आहे,

बैलांसाठी बांधण्यात आलेल्या गोठ्याला जनावरांसाठी गारवा रहावा म्हणून शिवले यांनी वरच्या बजूला बाजरीच्या पेंढ्यांच्या छपर्या व चहू बाजूने बाजरीच्या पेंढ्यांचे कुड बांधण्यात आले होते, विद्युत शॉर्टसर्किटमुळे आज सकाळी पहाटे चार वाजता आग लागली, बाजरीचे कुड व छपर्या मुळे आगीचे गंभीर स्वरूप निर्माण झाले, एक बैल कासरा तोडून बाहेर पडला , परंतु दोन खिल्लार गाडा शर्यतीचे बैल व एक घोडी आगीमध्ये होरपळून मृत्यू पावली आहे,

घटनास्थळी पुणे जिल्हा बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषद सदस्य पैलवान किरण साकोरे यांनी भेट घेऊन शिवले यांचे सांत्वन केले,

भरारी न्युज वृत्तसेवा,

Loading