March 30, 2026

सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले

           पंढरपुरहुन आषाढी वारीहून परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी वरवडे टोल नाक्यावर पुणे दिशेला जाणाऱ्या वारकऱ्यांना थांबवून चहा वाटप करण्यात येत होता . वारीच्या कारणे वाहनाना टोल फ्री करणेत आला होताच पण एक दान धर्मम्हणून,          

एका टोल वसुली बूथ शेजारी गॅसवर मोठे पातेले ठेवून चहा उकळवत येणाऱ्या प्रत्येक गाडीला थांबवून आगत्याने चहा देण्यात येत होता . एरव्ही टोल वसुली करताना वाद घालणाऱ्या टोलच्या कामगारांच्या तोंडी पंढरीच्या पांडुरंगाने इतकी विनम्र मवाळ भाषा पाहून एक सुखद अनुभव येत होता .     

अनेकदा आम्हा पत्रकारांनाही अडवू पहाणारे टोलवाले इतके गोड हमेशा राहोत अशी प्रतिकाया टोलचे व्यवस्थापक वैभव गायकवाड व अतुल कदम यांचे जवळ पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले व काही इतर नागरीकांनी दिली .