March 30, 2026
ब्रेकिंग…! वढू बुद्रुक कोरेगाव भीमा रस्त्यावर जीवघेणी ऊस वाहतूक 

ब्रेकिंग…! वढू बुद्रुक कोरेगाव भीमा रस्त्यावर जीवघेणी ऊस वाहतूक 

सुनील भंडारे पाटील 

वढू बुद्रुक कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) रस्त्यावर आज दुपारी कोरेगाव भीमात ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉली एका क्रेटा गाडीवर पलटी होऊन अपघात झाला या अपघातात क्रेटा गाडी पूर्णपणे चेंबली सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही,

          संबंधित ठिकाणी दुचाकी चार चाकी व इतर वाहनांची कायम वर्दळ असते, दुपारच्या सुमारास उन्हाचा तडाखा असल्याने तुरळक येजा होती, श्रीनाथ म्हस्कोबा सहकारी साखर कारखाना पाटेठाण या ठिकाणी चाललेला वडू बुद्रुक येथून ऊस वाहतूक ट्रॅक्टर जुगाड ट्रॉली च्या पाठीमागच्या ट्रॉलीचे चाक अचानक गळून पडल्याने, शेजारून चाललेल्या क्रेटा गाडीवर ही ट्रॉली पलटी झाली,

या अपघातात क्रेटा गाडीच्या काचा फुटून गाडी चेंबली नशिबाने या ठिकाणी कुठलाही दुचाकी स्वार नव्हता, त्यामुळे मोठे संकट टळले असे उपस्थितनि मत व्यक्त केले, एवढ्या सपाट व चांगल्या रस्त्यावर असा अपघात होणे, ही दुर्दैवी बाब आहे,

वाहन मालक तसेच चालक यांच्या हलगर्जी पणामुळे असे अपघात होत आहेत, यावर कुठेतरी पोलीस स्टेशन तसेच वाहतूक विभागाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, संबंधित खाते मोठे अपघात होण्याची वाट पाहत आहे काय असा प्रश्न देखील जनतेतून विचारला जात आहे, ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये ऊस खूप उंचीपर्यंत भरला जात असल्याने, पोस्ट ट्रॉली पलटी होती की काय असा भास होत आहे, प्रवास करताना शेजारून जाण्यासाठी भीती वाटत आहे, संबंधित वाहनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे,