March 30, 2026
केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धेमध्ये जि.प.प्राथमिक शाळा-हनुमानवाडी अष्टापूरचे घवघवीत यश

केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धेमध्ये जि.प.प्राथमिक शाळा-हनुमानवाडी अष्टापूरचे घवघवीत यश

सुनील भंडारे पाटील

यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा सन 2025 अंतर्गत मंगळवार दिनांक 18 .11 .2025 रोजी झालेल्या केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धेमध्ये जि. प .प्राथमिक शाळा हनुमानवाडी(अष्टापूर) शाळेने अतिशय चांगली कामगिरी करत घवघवीत असे एस संपादन केले,

या स्पर्धेमध्ये लोकनृत्य, बडबड गीत, वेशभूषा, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, लांब उडी, बेडूक उडी, बुद्धिबळ व वैयक्तिक गायन या स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक मिळवला तसेच लिंबू चमचा मुली, बेडूक उड्या मुली व कविता गायन इत्यादी स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक व लिंबू चमचा मुली या प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला .

या केंद्र पातळीवरील स्पर्धांमध्ये केंद्र अष्टापुर मधील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. अष्टापूर केंद्राची केंद्रप्रमुख शेषराव राठोड यांच्या नेतृत्वामध्ये अष्टापूर केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी वेगवेगळ्या स्पर्धांचे पंच म्हणून अचूक कामगिरी पार पाडली. अतिशय चुरशीच्या व खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केले त्याअनुषंघाने विद्यार्थ्यांचे कौतुक करावे व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा म्हणून विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी अष्टापूर ग्रामपंचायतीचे रामदासजी कोतवाल (माजी सरपंच), सचिनजी कोतवाल (अध्यक्ष-शा.व्य.समिती-हनुमानवाडी ), गणेश कोतवाल(विद्यमान उपसरपंच,ग्रा.पं.अष्टापूर), सचिन साळुंखे (मुख्याध्यापक), उषा बोर्डे मॅडम हे उपस्थित होते.