March 30, 2026
थोरांदळे येथे भारतीय उद्योजिका विकास संस्था यांच्या पुढाकारातून महिला उद्योजिकांना एमएसडीपी प्रमाणपत्र वितरण

थोरांदळे येथे भारतीय उद्योजिका विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुढाकारातून महिला उद्योजिकांना एमएसडीपी प्रमाणपत्र वितरण.

आंबेगाव प्रतिनिधी प्रमिला टेमगरे

ग्रामीण महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने भारतीय उद्योजकता विकास संस्थान . अहमदाबाद यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या २० दिवसीय सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास (एमएसडीपी) प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या महिला उद्योजिकांना यावेळी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

भारतीय उद्योजिका अ‍ॅक्सेंचर यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील महिलांना उद्योजकतेकडे प्रेरित करण्यासाठी विविध व्यावहारिक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षण कालावधीत महिलांना रसायनमुक्त साबण, हॅण्डवॉश व बॉडीवॉश याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. यासोबतच पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग, व्यवसाय व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करून महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी सक्षम बनविण्यात आले.

समारोप कार्यक्रमाच्या वेळी उपसरपंच श्री.संदीप टेमगिरे, सामाजिक कार्यकर्ते दिनकर विश्वासराव, उमेदचे अंबिका मुंडे,प्रियंका मोहरले, सीआरपी अश्विनी टेमगिरे व प्रमिला टेमगिरे,ग्राम संघ अध्यक्ष संगीता टेमगिरे. व ग्राम संघातील सर्व महिला पदाधिकारी , ट्रेनर स्वाती शिंदे, तसेच भारतीय उद्योजिका संस्थेचे विकास गोफणे व रजनी मिरके यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय उद्योजिका यांच्या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण महिलांना उद्योजकतेच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्यासाठी असे प्रशिक्षण उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वउद्योग उभारावा व कुटुंबाच्या तसेच समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.

कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला

Loading