रांजणगाव गणपती प्रतिनिधी
रांजणगाव गणपती (तालुका शिरूर) येथील औद्योगिक वसाहातीमधील यझाकी कंपनीतील एका अधिकाऱ्-याला खोट्या तक्रारी देण्याच्या कारणावरुन पेरणे फाटा येथील चार जणांनी मारहाण करण्यात आली आहे. या बाबत सुरेश मारुती ननवरे( वय ४४ ) यांनी पोलीसांत फिर्याद दिली आहे.
राजेंद्र पांडुरंग निचीत , संदीप शिवाजी निचीत , स्वाती विजय निचीत , विजय पांडुरंग निचित सर्व राहणार पेरणे तालुका हवेली यांनी सुरेश मारुती ननवरे यांना २२ नोव्हेंबर रोजी ४ वा ३० मी. च्या सुमारास औद्योगिक वसाहाती मधील यझाकी कंपनी समोर लोखंडी हत्याराने मारहाण केली. व त्यात ननवरे हे जखमी झाले. तू आमचा भाऊ विजय नीचीत याच्याविरुद्ध कंपनीतील महिलांना खोट्या तक्रारी देण्यास का लावतो असे म्हणून संदीप निचित याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने फिर्यादीचे ,डोक्यात, कंबरेवर उजव्या पाय ,उजव्या हातावर मारून राजेंद्र निचीत याने फिर्यादीस हाताने मारहाण करून विजय निचीत व स्वाती निचीत यांनी शिवीगाळ दमदाठी केली आहे.
त्यामध्ये सुरेश ननवरे यांच्या डोक्यात डाव्या कानाच्या वर गंभीर जखम झाली असून कमरेवर उजवे पायावर, उजव्या हाताचे बोटास जखम झाली आहे .या बाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी भा.द.वि. कलम ३२६,३२४,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे हे करीत आहेत.

