March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
               शिरूर तालुक्यात शेती क्षेत्रामध्ये महत्त्वाचा समजला जाणारा साखर कारखाना, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाचा पदभार घेतल्यानंतर नवनिर्वाचित चेअरमन ऋषिराज अशोक (बापू) पवार यांची सुरुवातच दणकेबाज, कारखान्याला नवसंजीवनी          

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली 21 संचालकांपैकी 20 संचालक निवडून शेतकरी विकास पॅनल ने विजयाचा ध्वज फडकवला, बहुमताने सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर सर्वांमध्ये तरुण तडफदार नवीन नेतृत्व ऋषिराज पवार यांची एकमताने चेअरमन पदी निवड करण्यात आली, शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक (बापू) पवार व संचालक मंडळाच्या उपस्थितीत रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाचा अधिकृत पदभार स्वीकारण्यात आला, हा पदभार स्वीकारताना चेअरमन पदाला  साजेशेचे काम जोपर्यंत माझ्या हातून होत नाही तोपर्यंत मी स्वतःला चेअरमन म्हणून घेणार नाही, तसेच कारखान्याचे वाहन वापरणार नाही अशा स्वरूपाच्या दोन महत्त्वाच्या घोषणा केल्याने ऋषिराज पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे,

      कारखान्याच्या कारकिर्दीमध्ये शिरूर तालुक्यातील ऊस बागायत शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे, आणि आता कारखान्याची सूत्र तरुण तडफदार नेतृत्वाला मिळाल्याने कारखान्याला आता नवजीवन संजीवनी मिळणार आहे अशा स्वरूपाची चर्चा नागरिकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये आहे,