.
आंबेगाव प्रमिला टेमगिरे
मंचर ( आंबेगाव ): मंचर ते भीमाशंकर रस्त्यावर मंचरच्या पश्चिमेला चिंचपूरेमळा -तपनेश्वर मंदिर येथे दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे विजेच्या तारा सह झाड रस्त्यावर कोसळले. सुदैवाने त्यावेळी कुठलेही वाहन रस्त्यावर नव्हते.त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सोमवारी संध्याकाळी पाऊस पडत होता.तेथे राहणारे संजय चिंचपूरे यांच्या समक्ष ही घटना त्यांनी ताबडतोब निघोटवाडी ग्रामपंचायतचे सरपंच नवनाथ निघोट व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली.नवनाथ निघोट, ग्रामपंचायत सदस्य आशिष बाणखेले, संजय चिंचपुरे,वसंत बाणखेले,रामदास बाणखेले,संदीप पिंगळे ग्रामस्थ व महावितरण कंपनीचे जनमित्र ताबडतोब घटनास्थळीआले.
तोपर्यंत दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बाह्य वळण मार्गे घोडेगाव भीमाशंकर ची वाहतूक सुरू करण्यात आली. पाऊण तासाने झाड व विजेच्या वाहिन्या दूर करण्यात आल्या. त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.


