March 30, 2026
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे 
             शिरूर नगरपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी शिरुर शहर व जिल्हा भाजपा च्या वतीने  राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली  असल्याची माहिती भाजपा उद्योग आघाडी पूणे जिल्हा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी  दिली.       

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने शिरुर नगरपरिषदेच्या  निवडणूकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केल्या नुसार २० जुलै २०२२ ते १८ आँगस्ट २०२२ या कालावधीत राज्यातील ९२ नगरपारीषद व नगरपंचायतीच्या 

निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी सुप्रिम कोर्टाने तसे आदेशही दिले होते. त्याच आधारे या निवडणुका महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडुन जाहीर करण्यात आल्या आहेत.   

परंतु सध्या पावसाळा सुरू असुन त्यामुळे निवडणूक घेणे कठीण असुन त्याचा परिणाम मतदानावर सुद्धा होईल. त्यामुळे शिरुर नगरपरिषदेच्या निवडणूकीचा कार्यक्रम कालावधी पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी शिरुर शहर भाजपा चे अध्यक्ष नितीनदादा पाचर्णें , कार्याध्यक्ष मितेश गादिया व शहर भाजपा च्या वतीने   महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या प्रसंगी  माजी मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सदाभाऊ खोत , जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, उपाध्यक्ष दादासाहेब सातव, भाजपा उद्योग आघाडी पूणे जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष संजय पाचंगे, यांच्या उपस्थितीत लेखी मागणी  राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

     महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे आयुक्त डॉ. यु. पी  मदान साहेब यांनी मागणीचा योग्य तो विचार करून निर्णय घेतला जाईल असे सांगितले.