.
आंबेगाव प्रमिला टेमगिरे
शिंगवे पारगाव ( ता आंबेगाव ) येथील श्री संगमेश्वर माध्यमिक व कै बाबुराव गेणुजी ढोबळे उच्च माध्यमिक कला,वाणिज्य,व विज्ञान विद्यालयात आषाढी वारी निमित्त विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा पार पडला.
या सोहळ्यात इयत्ता पाचवी ते आठवी चे विद्यार्थी सहभागी झाले होते. विठोबा रुक्माई, ज्ञानोबा तुकाराम. मृदंग टाळांच्या गजरात माऊलींची दिंडी सोहळा गावातून काढण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान केला होता.याप्रसंगी अनेक ग्रामस्थ दिंडी सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.
अनेक विद्यार्थ्यांनी अभंग म्हटले.विद्यालयाच्या मैदानावर रिंगण सोहळा पार पडला. बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा पाहिला. विठोबा रुक्माई, ज्ञानोबा तुकाराम, राम कृष्ण हरी च्या गजरात शालेय परिसर दणाणून गेला.
यात वेगवेगळे कार्यक्रम पार पडले विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळल्या.विद्यालयातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. , या दिंडी सोहळा साठी ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ पारगाव यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन मा प्राचार्य श्री प्रकाश सुतार सुर व पर्यवेक्षक श्री कैलास येलभर सर व विद्यालयातील सर्व शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले स्कुल कमिटी चेअरमण मा . श्री शिवाजीराव बाबुराव ढोबळे (आबा) व संचालक मा. श्री . शांताराम ढोबळे ( गुरुजी ) यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले,


