March 30, 2026
गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
        निर्वी (ता. शिरूर) :- येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने रब्बी हंगाम प्रशिक्षण मोहीम अंतर्गत रब्बी हंगाम पुर्व तयारी प्रशिक्षण व ज्वारी लागवड तंत्रज्ञान तसेच कांदा लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन मेळावा आयोजित केला असल्याची माहिती सरपंच शोभा तरटे यांनी दिली 

निर्वी येथे मंगळवार दि २७ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार असुन कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालेले व कांदा पिकाची नवीन जातीचे संशोधन केलेले संदीप घोले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे  कृषी विभागाच्या विविध योजना बाबत तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे माहिती देण्याकामी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिरूर खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार असुन गावचे सरपंच शोभा तरटे उपसरपंच मनिषा पवार सोसायटी चेअरमन शरद सोनवणे व्हॉईस चेअरमन बाबा कोळपे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत कार्यक्रम यशस्वी होणेकामी ग्रामपंचायत सदस्य अनिल कांबळे तसेच मा उपसरपंच निलेश सोनवणे सह कृषी सहायक जयवंत भगत व ग्रामपंचायत कार्यालय योगदान देणार आहेत कांदा लागवड तंत्रज्ञानचा फायदा गुनाट निमोणे शिंदोडी धुमाळवाडी निर्वी चिंचणी सह परिसरातील शेतकर्‍यांना होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे,