March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
               जातेगाव बुद्रुक येथील श्री गुरुदत्त ग्राम विकास प्रतिष्ठानचे जिजामाता महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला.        

महाविद्यालयीन युवकांनी राष्ट्रीय सेवा योजना दिवस वृक्षारोपण व परिसर स्वच्छता करून साजरा केला. संभाजीराजे माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर “राष्ट्रीय सेवा योजनेतील युवकांची भूमिका” या विषयावर प्रा. रोहिदास लवांडे यांनी मनोगत व्यक्त केले. युवकांनी स्वामी विवेकानंदाचे विचार, संभाजीराजांचे विचार ,वाचन संस्कृती ,वक्तृत्व स्पर्धेमधील  सहभाग, आत्मविश्वासाची आवश्यकता यावरती भर दिला पाहिजे असे प्रा.लवांडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.जी. इंगवले, समन्वयक गजानन पाठक, कार्यालयीन अधीक्षक आनंद अंकुश, प्रा. प्रिती पवार, डॉ.विजय गायकवाड, प्रा. रोहिणी जराड, प्रा.अशोक शिंदे,  प्रा.अमोल धापटे, प्रा.अश्विनी खेडकर, प्रा.सारिका जेधे, प्रा.योगिता इंगळे, प्रा. सीमा बांगर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय गायकवाड यांनी केले तर प्रा.पुजा काटे यांनी आभार मानले.