March 30, 2026
सासवड बापू मुळीक 
     पुरंदर तालुक्याचे भाग्यविधाते, शिक्षणमहर्षी स्व चंदूकाका जगताप यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून पुरंदर – हवेलीसह परीसरातील तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील मुलांमुलींपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवत मुलांना साक्षर आणि सक्षम केले.       

त्यांच्या या कार्याचा आणि विचारांचा वसा आमदार संजय जगताप आणि ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप या पुढे घेऊन जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पुरंदर – हवेलीतील गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदतीसाठी ग्रामीण संस्थेच्या वतीने ” चंदूकाका जगताप शैक्षणिक शिष्यवृत्ती २०२२” या उपक्रमाची सुरुवात सोमवारी, दि २६ सप्टेंबर रोजी होणार आहे.

सासवड नगरपरिषदेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात सोमवारी ( दि २६ ) सकाळी ९ वाजता पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या उपस्थितीत या योजनेतून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश देण्यात येणार आहेत. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध करत सुशिक्षित व सुसंस्कृत युवा पिढी निर्माण करण्याचा ग्रामीण संस्थेचा निश्चय असल्याचे अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांनी सांगितले. ग्रामीण संस्था सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असून या संस्थेमार्फत महिलांना आरोग्य कार्ड, आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. तसेच कोरोना काळात कोविड केअर सेंटर, आनंदी थाळी, लसीकरण आदी अनेक उपक्रम राबवून संस्था समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचून आधार देत असल्याचे चंदूकाका जगताप शैक्षणिक शिष्यवृत्ती निवड समितीचे सदस्य रवींद्रपंत जगताप यांनी सांगितले. आमदार संजय जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा डॉ एम एस जाधव, रवींद्रपंत जगताप, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, महेश राऊत, अनिकेत भगत, विवेक जगताप, सुरज गदादे, हर्षदा पवार, दीपराज मेमाणे, आदित्य होले आदी या उपक्रमाचे संयोजन करीत आहेत.