ब्रेकिंग…! वढू बुद्रुक येथे स्वीट होम फोडून चोरी
सुनील भंडारे पाटील
वडू बुद्रुक (तालुका शिरूर) येथे गावातील मुख्य चौकात असणारे शुभम भंडारे यांचे महादेव स्वीट होम हे दुकान आज मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन चोरट्यांनी शटरचा दरवाजा तोडून पाचशे रुपयांची रोकड लंपास केली,
या भागामध्ये दिवसेंदिवस भुरटे चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून आज सोमवार दिनांक ४/८/२०२५ रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन चोरट्यांनी गावातील चौकामधील महादेव स्वीट होम या दुकानाचा शटरचा दरवाजा तोडून आत मधील कॅश काऊंटर मधील पाचशे रुपयांची रोकड चोरून नेली, इतर कुठल्याही खाद्यपदार्थाला मात्र त्यांनी हातही लावला नाही,
याबाबत गावचे पोलीस पाटील जयसिंग भंडारे पाटील यांना खबर देऊन शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्यात आला आहे, आज सकाळी दिवस उगवल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले,
