March 30, 2026
श्री दुर्ग संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित ‘श्री लोहगड अभ्यास व संवर्धन मोहीम’ यशस्वी

श्री दुर्ग संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य आयोजित ‘श्री लोहगड अभ्यास व संवर्धन मोहीम’ यशस्वीपणे पार पडली. या मोहिमे दरम्यान गडाचा अभ्यास, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृती अशा अनेक गोष्टींचा समावेश होता.

वारजे माळवाडी प्रतिनिधी विठ्ठल टाले 

मोहिमेची सुरुवात श्री महादेव पूजन व दर्शनाने करण्यात आली. त्यानंतर महादेवाच्या मंदिरासमोरील जुना भगवा ध्वज उतरवून नविन ध्वज बसवण्यात आला.

तसेच अष्टकोनी पाण्याचे टाके, महादरवाजा व बुरुजवरील वाढलेले गवत व झाडे काढुन साफ करण्यात आले, तसेच प्लास्टिक व कचऱ्याचे संकलन करुन योग्य विल्हेवाट लावण्यात आली

आणि “गड वाचवा, इतिहास जपा” या संकल्पनेनुसार पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गड परिसरात जनजागृती पोस्टर्स देखील लावण्यात आले.

या मोहिमेत संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व स्थानिक गडप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गडाच्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत श्रमदान, इतिहासवाचन व वास्तू अभ्यास करण्यात आला.

अभ्यासकांनी लोहगडावरील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंचे – गणेश दरवाजा, हनुमान बुरुज, ध्वजस्तंभ, पाण्याची टाकी, विनायक दरवाजा यांचे सविस्तर निरीक्षण केले व नोंदी केल्या. तसेच भविष्यात गडाच्या संवर्धनासाठी कोणत्या गोष्टी करता येतील यावर चर्चा व प्राथमिक अभ्यासही करण्यात आला.

ही मोहीम दुर्गसंवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे. संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, राज्यातील इतर किल्ल्यांवर देखील अशाच अभ्यास व स्वच्छता मोहिमा राबवण्यात येणार आहेत.

अधिक माहिती व पुढील मोहिमेसाठी संपर्क:

साहिल पवार – ९३५६७४४९९१

विठ्ठल टाले – ९८२३२२०५२७

श्री दुर्ग संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व शिवभक्त, स्वयंसेवक, सहकार्य करणारे स्थानिक नागरिक, मार्गदर्शक व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार यावेळी मान्यता आले,