March 30, 2026
वाघोली ते आळंदी बस सेवा बंद केल्याने प्रवाशांचे हाल

वाघोली ते आळंदी बस सेवा बंद केल्याने प्रवाशांचे हाल 

सुनील भंडारे पाटील 

वाघोली लोणीकंद तुळापूर फाटा मार्गे आळंदीला जाणारी बससेवा अचानक बंद केल्याने प्रवाशांचे खूपच हाल होऊ लागले आहेत, त्यामुळे ही बस सेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे,

संबंधित मार्गावर पुणे शहराकडून तसेच वाघोली मार्गे लोणीकंद आळंदी फाटा वडू खुर्द फुलगाव तसेच स्वराज्याची दुसरी पंढरी असणारे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ तुळापूर, मरकळ, सोळू, मार्गे आळंदी ला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असून पुणे पिंपरी चिंचवड परिवहन महामंडळाने अचानक ही बस सेवा बंद केल्याने लोकांचे खूपच हाल होऊ लागले आहेत,

तुळापूर मरकळ येथील पुलावरून प्रवाशांची रांग लागली असून मरकच्या बाजूने प्रवाशांना पुलावरून पायी यावे लागत आहे, दिवसभर ही परिस्थिती अशीच आहे, बस सेवा बंद झाल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे,

सद्यस्थितीत सणासुदीचे दिवस असून तसेच फुलगाव येथील श्री शनिदेव मंदिर तसेच पेशवे कालीन कमानी घाट, तसेच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्याची दुसरी पंढरी समजल्या जाणाऱ्या धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी तुळापूर या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या शंभू भक्तांची दाट संख्या,

त्याचप्रमाणे पुढे आळंदीला श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी स्थळ या ठिकाणी जाणाऱ्या भाविक भक्तांची संख्या जास्त असून अशा मार्गावरील बस सेवा बंद करून प्रवाशांच्या हाल करण्याचे महा भयंकर पाप पुणे पिंपरी चिंचवड परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केल्याची चर्चा प्रवाशांमध्ये आहे,

महत्त्वाचा मार्ग असणाऱ्या या मार्गावरील बस सेवा बंद करण्याचे धाडस कसे केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, संबंधित मार्गावरील बस सेवा तातडीने चालू करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे,

शंभू भक्त, मराठा सेवक, मनसे हवेली तालुका संघटक सुनील राऊत यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे पिंपरी चिंचवड परिवहन महामंडळाला बस बंद करण्याचे पत्र दिले आहे, मार्गावरील तुळापूर येथील पूल वाहतुकीस योग्य नसल्याने परंतु दुसरीकडे खडी क्रशर वाहतुकीचे मोठे हायवा डंपर त्यावरून जाताना पुलाला धोका नाही का? बस बंद केल्याचे कारण सांगा, बस बंद करून हेवी लाइन चालू का ठेवली? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला असून प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून तातडीने बस सेवा चालू करावी अशी मागणी त्यांनी या वेळ केली,