महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सेवानिवृत्त पोलिस संघटनांचे एकीकरण
प्रतिनिधी संभाजी चौधरी
पुणे येथे राज्य पातळीवरील सेवानिवृत्त पोलीस महा संघाची स्थापना करण्यात आली.
सेवानिवृत्त पोलीस महा संघाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्याचे प्रतिनिधी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी महासंघाच्या बैठकी साठी हजर होते.
सेवानिवृत्त पोलिसांच्या विविध अडी अडचणी,वैद्यकीय सुविधे अभावी होत असलेली कुचंबना पदोन्नती बाबतीतील अडचणी
तसेच हक्काचे देय लाभ वेळेवर न मिळणे.अशा विविध प्रश्नांवर महा संघाच्या बैठकी मध्ये चर्चा करण्यात आली.
राज्यातून आलेल्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रतिनिधीने सेवानिवृत्त पोलिसांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हक्काचे लाभ मिळण्यात येत असलेल्या अडचणी बाबतीत संबंधित घटक प्रमुखाच्या कार्यालयात होत असलेली हेडसांड याबाबतीत तक्रारी मांडल्या. महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष
महादेव पवार यांनी महा संघाच्या माध्यमातून करावयाच्या कार्यवाही बाबत सविस्तर निवेदन बैठकीमध्ये केले.
महासंघाचे उपाध्यक्ष शरदराव पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.संस्थेचे मार्गदर्शक हरी शेळके यांनी महासंघाच्या बैठकीचे चांगल्या प्रकारे आयोजन केले सेवानिवृत्त परिसराधिकारी तानाजी राव वाळके, सुरेश राव शेळके, तापकीर, परशुराम जगताप या सर्वांचे बैठकीच्या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
