March 30, 2026
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
        शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत सभासदांचा विश्वास संपादन केला.     

आज गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर पतसंस्थेच्या झालेल्या मासिक मीटिंगमध्ये सभापतीपदी श्री. म्हतारबा बारहाते यांची बहुमताने तर उपसभापतीपदी सौ. अंजली शिंदे ,खजिनदारपदी चंद्रकांत खैरे व मानद सचिवपदी संदीप थोरात यांची बिनविरोध निवड झाली .  

यावेळी नूतन सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. पॅनल प्रमुख श्री अनिल पलांडे व शिवाजीराव वाळके, मोहनराव थोरात, सोपान आबा धुमाळ यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी तालुक्यातील संस्थेचे बहुसंख्य सभासद बंधु-भगिनी उस्फूर्तपणे भर पावसातही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाजी पवार यांनी केले तर सखाराम फंड यांनी आभार मानले.   

बेट भागाला सभापतीपदाची संधी दिल्याबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी  श्री.प्रभाकर गावडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. निवडी बद्दल सर्व समाधान व्यक्त सभासदांनी समाधान व्यक्त केले. सर्वांना विश्वासात घेऊन पारदर्शकपणे सभासद हिताचा कारभार यापुढेही चालू ठेवणार असल्याचे नवनिर्वाचित सभापती श्री. बारहाते यांनी सांगितले.