ब्रेकिंग…! व्यंकटेशकृपा शुगर मिल्स लि. ला “बेस्ट शुगर फॅक्टरी परफॉर्मन्स ” पुरस्कार २०२५
शिरूर तालुक्याच्या व शेतकऱ्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा
सुनील भंडारे पाटील
द डेक्कन शुगर टेक्नालजिस्ट असोसीऐशन ऑफ (इंडिया) यांच्या वतीने दे्यात येणारा सन २०२४- २५ या गाळप वर्षातील “बेस्ट शगर फॅक्टरी परफॉर्मन्स पुरस्कार पुणे जिल्हयातील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स लि जातेगांव बु। ता. शिरूरला नुकताच देण्यात आला,
पुण्यातील जे डब्ल्यू मैरियट येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार दतात्रय भरणे व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी कारखान्या तर्के अथर्व सचिन तौर विवेक सोनवणे . असि. जनरल मँॅनेजर , तुषार निघुते चिफ इंजिनिअर, माणिक पवार प्रोडक्शन मॅनेजर, संजय यादव डिस्टीलरी मॅनेजर , संकेत सुतार सिव्हिल इंजिनिअर उपस्थित होते.
हा पुरस्कार कारखान्याने देशामध्ये कमीत कमी स्टीमचा वापर करून जास्तीत जास्त गाळप घेतल्याने प्रदान करण्यात आला आहे. असे कारखान्याचे चेअरमन संदीपजी तौर व जनरल मॅनेजर किरण दोरगे यांनी सांगितले,
शिरूर तालुक्यामध्ये श्री व्यंकटेश कृपा सहकारी साखर कारखान्याचे महत्व अनन्यसाधारण असून शेतकऱ्यांचे हृदय असणाऱ्या या कारखान्याकडून शेतकऱ्यांना कायम मदतीचे धोरण ठेवले जात आहे, शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी साखर वाटप देखील केले जात आहे,
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचा तोडलेला ऊस उन्हाच्या वातावरणात सुकून न देता वजन घटू नये म्हणून चार ते पाच तासात कारखान्यावर वजन करून ऊस खाली केला जात आहे, इतर काही बाबींमध्ये देखील कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात असल्यामुळे हा कारखाना शेतकऱ्यांचा हृदय ठरला आहे,
व्यंकटेश कृपा सहकारी साखर कारखान्याला बेस्ट शुगर फॅक्टरी परफॉर्मन्स 2025 हा पुरस्कार मिळाल्याने शिरूर तालुक्याच्या खाना कोपऱ्यातून कौतुक व्यक्त होत असून शिरूर तालुका तसेच शिरूर तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा लावला असल्याची चर्चा चालू आहे तसेच कारखान्याचे चेअरमन संदीपजी तौर यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,
