पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे बोलत होते.या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे व सर्व प्राध्यापकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.संजय भोईटे, व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख प्रा.अरुण शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मनिषा ठोंगिरे, प्रा. सुरेश मोरे, प्रा.हेमंतकुमार सावंत, प्रा. एन. बी.मुल्ला, प्रा.राधिका इप्पकायल, प्रा. जी. एस. बडनौरू, प्रा.अविनाश मदने, प्रा.अनिल दाहोत्रे, प्रा. एम.डी. शिंदे, प्रा.एस.डी.शिंदे, प्रा. आर. पी. गोरे, प्रा. आर.व्ही.राऊत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संजय भोईटे यांनी केले. प्रा. प्रिया आरडे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. भागवत पाटील यांनी आभार मानले.


