March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 

        पुणे वाघोली पोलीस स्टेशन समोर तरुणाने स्वताहाला पेटवून घेतले ही दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने वाघोली व पंचक्रोशीतील परिसरामध्ये खळबळ उडाली आहे,

             सोसायटीच्या वादातून मारहाण झाल्यानंतर पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नसल्याने 28 वर्षीय तरुणाने आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाघोली पोलीस चौकी समोर स्वतःला पेटून घेतले.

           यामध्ये तो ९० टक्के भाजला आहे. त्याला वाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथून पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. 
 रोहिदास अशोक जाधव ( वय २८, रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली ) असे जाळून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे,
                जाधव आणि बिल्डर यांच्यामध्ये फ्लॅट खरेदी विक्री वरून वाद होता, त्यांच्यामध्ये आज बाचाबाची झाल्यानंतर संबंधित तरुण वाघोली पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आला असता त्याची तक्रार न स्वीकारल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे, तसेच अशा स्वरूपाची चर्चा नागरिकांमध्ये आहे,