March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
        सलग चौथ्या दिवशी ही मनोज जरांगे पाटील यांच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरूच आहे. सलग चौथ्या दिवशी उपोषण सुरूच असल्याचे त्यांची प्रकृती पुर्नता ढासळली आहे.मात्र त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे.

          तर कुणबी मराठ्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांच्या मसुद्यात अधि सूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे.या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतर वाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे तर अधि सूचनेची अंमलबजावणी झाली नाही तर देशात आंदोलन करू असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. येत्या १५ फेब्रुवारीला अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रात काय होतं ते समजेल असेही जरांगे पाटील  म्हणाले आहे.