शिरूर तालुक्यामधील गर्भलिंग चेक करणाऱ्या डॉक्टर वर कारवाई होणार का?
सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यामधील दौंड तालुक्यामध्ये गर्भलिंग चेक करणाऱ्या केडगाव येथील प्रकरण ताजे असताना आता शिरूर तालुक्यामधील एका डॉक्टरचे नाव पुढे आले असून संबंधी डॉक्टरचे गर्भलिंग तपासणी बाबतचे संभाषण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे,
गर्भलिंग तपासणी बाबत दौंड तालुक्याबरोबर आता शिरूर तालुक्याचेही नाव समोर येत आहे,
दौंड तालुक्यामध्ये ही तपासणी होत असल्याची बातमी समोर आल्यानंतर समाजातील अनेक स्तरातून या घटनेचा निषेध केला गेला,
त्यातच शिरूर तालुक्यातील एका खाजगी हॉस्पिटल चालवणाऱ्या डॉक्टरचे नाव समोर आले आहे, संबंधित डॉक्टर गर्भलिंग तपासणीसाठी 50 हजार रुपये एका महिलेकडे मागणी करत असल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे,
आर्थिक परिस्थिती नसताना ती महिला तपासणी फी कमी करण्याची विनंती करीत असताना डॉक्टर भविष्यात रेट वाढणार आहेत असे देखील सांगत आहे, यावरून दौंड तालुक्यातून या गर्भलिंग तपासणी रॅकेटची आता शिरूर तालुक्यामध्ये हितसंबंध असल्याचे उघड होत आहे,
संबंध ऑडिओ क्लिप पोलिसांच्या देखील हाती लागली असून यावर पुणे जिल्हा आरोग्य विभाग काय ॲक्शन घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, दौंड तालुक्यातील गर्भलिंग तपासणी रॅकेटची चौकशी करण्यासाठी एस आय टी ची टीम नेमण्यात आली असून आता ही टीम शिरूर तालुक्यातील या डॉक्टरवर काय ॲक्शन घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,
![]()
