March 30, 2026

लोणी काळभोर प्रतिनिधी

              आज गणेश जयंती मंगळवारी (अंगारक योग ) आल्याने भाविकांनी श्रीक्षेत्र थेऊर (तालुका हवेली) येथील श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी आगलावे यांच्या हस्ते श्रींची महापूजा करण्यात आली. चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली,

            यावेळी विश्वस्त केशव उमेश विद्वांस उपस्थित होते. देवस्थान व आगलावे बंधूंतर्फे मंदिर प्रांगणात मांडव घालण्यात आले होते, दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि पिंपरी सेरोलोजिकल ब्लड सेंटर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्याला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली. दिवसभर भाविकांची गर्दी कमी जास्त होत होती. दर्शनाला येणार्‍या भक्तांची गर्दी वाढली. जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने देवस्थान तर्फे जादा सुरक्षा व्यवस्था करण्यात केली होती. ग्रामपंचायती तर्फे पार्किंगची  व्यवस्था करण्यात आली  होती. .चिंचवड देवस्थान ट्रस्ट वतीने माघी गणेश उत्सव साजरा करण्यात आला.