March 30, 2026

लोणी काळभोर अनिकेत मुळीक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय संस्थापकीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी उद्याच्या मनसे मेळाव्याबद्दल कार्यक्रम पुढे ढकलल्या संदर्भात दिलेले पत्र मधील माहिती अशी,

“तुम्हाला जरा थोड्या तातडीनं कळवतो आहे. आपण वास्तविक उद्या एका मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन विस्कळीत आहेच, परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हाला सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे,” असं राज म्हणाले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन हे पत्र शेअर करण्यात आलं आहे.राज्यात सुरु असणाऱ्या सततच्या पावासामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पुढे ढकलण्यात आलाय. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच पत्र लिहून यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. सध्याची पावसाची स्थिती पाहता मी उद्या जो कार्यक्रम तुम्हाला सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे, असं राज यांनी पत्रात म्हटलंय.

*नागरिकांच्या जनहितार्थ..*🌧️🌧️🌧️🌧️⛈️🌩️🌧️🌧️

आज दिवसभर  प्रचंड पाऊस आहे
आपल्याला पूर्व हवेली व आसपासच्या परिसरात कसलीही मदत लागली, तर आपण आमच्या जवळच्या महाराष्ट्र सैनिक /पदाधिकारी यांना  कळवू शकता .
तसेच आपण मनसे हेल्पलाइन क्रमांक 
8888107797 , 9730046774 या माझा नंबरवर संपर्क करू शकता………
*आपला*
राहूल कदम 
अध्यक्ष पुणे जिल्हा विधी व जनहित
महाराष्ट्र नवनिर्माण सेना*