March 30, 2026

भीमाशंकर मिलिंद टेमकर 

             श्री क्षेत्र भीमाशंकर (ता आंबेगाव ) येथील पवित्र शिवलिंग आहे.बारा जोतिलींगापैकी एक पुरातन शिवमंदिर आहे. येथील शिव दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक आणि पर्यटक येत असतात.उल्हासनगरमधील सहा तरूण देव दर्शन घेण्यासाठी आले होते.त्यावेळी भीमाशंकर येथील अभयारण्यात सोबत माहितगार नसल्याने रस्ता चुकल,            

त्यांतच पाऊस आणि धूके होते त्यामुळे घाबरून जाऊन त्यांनी घोडेगाव येथील मित्राला फोन करून सांगितले.त्यानतर त्या मित्राने घोडेगाव येथील पोलिस स्टेशनशी संपर्क साधला त्यावेळी घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी शोध मोहीमेसाठी भीमाशंकर शंकर येथे असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलिस हवालदार गणेश गवारी, मनिषा तुरे,तेजस इष्टे,वृशाली भोर, रोहीदास गवारी यांना माहिती देऊन दुसऱ्या बाजूने पोलिस निरीक्षक जीवन माने, पोलिस हवालदार माणिक मुळूक, नामदेव ठेंगळे, स्वप्निल कानडे या दोन पथकांनी रात्रीच्या वेळी अंधारात बटरीच्या उजेडात शोध कार्य चालू होते.

त्यातच पाऊस आणि धूके दाट होते.तरीही चार ते पाच तासांच्या कालावधीत अथक परिश्रमातून त्यांना खोल दरीत (बैल घाटात) हे तरुण मिळाले.त्यानतर त्यांना भीमाशंकरला आणण्यात आले, त्या सहा व्यक्तींची नावे अशी आहेत,

१) सर्वेश श्रीनिवास जाधव वय २६
२)पवन अरूण प्रतापसिंह वय २६
३) अंकुश सत्यप्रकाश तिवारी वय२३
४) दिनेश धर्मराज यादव वय २३
५)हितेश  श्रीनिवास यादव वय२५
६)निरज रामदास जाधव वय २८
निसर्गाशी सगळ्यांचं अतूट नात असत पण तिथल्या डोंगर वाटा माहिती असल्याशिवाय कोणतीही रिस्क घेऊ नये हे यातून सिद्ध झाले असून या सहा व्यक्तींचे नसीब बलबत्तर म्हणून जीवनदान भेटले, त्यामुळे या भागात पर्यटकांनी अशा स्वरूपाचा धोका पत्करु नये,