March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला             
               सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय  रा.से.यो.विभाग यांच्या वतीने २४ सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना दिवस महाविद्यालयात संपन्न झाला.

     महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे होते. याप्रसंगी बोलताना डॉ. बाळकृष्ण झावरे म्हणाले की महाविद्यालयात रा.से.यो.चे २५० स्वयंसेवकांचे युनिट असून युवकांनी राष्ट्रसेवा व लोकांच्या सेवेसाठी रचनात्मक कार्य करावे. स्वयंसेवकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करुन सुचना स्वत: अंमलात आणणे आवश्यक असून हा या योजनेचा उद्देश असल्याचेही प्राचार्य डॉ. झावरे यांनी  सांगितले. यावेळी उपप्राचार्य डॉ.शिवाजी शिंदे, डॉ. भरत राठोड, डॉ. अशोक शेळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयातील रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीनिवास इपलपल्ली, डॉ. प्रकाश हुंबाड, डॉ. मेघना भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शोभा तितर यांनी केले.