March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
    श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालय लोणीकंद (तालुका हवेली) मध्ये 29 सप्टेंबरला स्वर रंग युवक महोत्सवाचे विभागीय व जिल्हास्तरावर आयोजन करण्यात आले आहे    

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे स्वर रंग युवक महोत्सव श्रीरामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयात  होणार असून या अंतर्गत विभागीय जिल्हास्तरीय स्तरातील थरातील फेरी 29 सप्टेंबरला नियोजित आहे   तरी सर्व महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे पुणे विद्यापीठातर्फे होणाऱ्या स्वर रंग विभागीय जिल्हास्तरीय अंतर महाविद्यालय युवक महोत्सवामध्ये संगीत नृत्य, रंगमंचीय कला, ललित कला, वाडमय कला, असे अनेक प्रकार च्या स्पर्धा होणार आहे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून आपले कला गुण सादर करण्याची संधी देण्यात आली आहे या फेरीतील  कामगिरीच्या आधारावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आगामी राज्यस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवासाठी पुणे विद्यापीठाच्या संघामध्ये समावेश करण्यात येणार आहे व सर्वांना सर्टिफिकेट देण्यात येतील. पुणे विद्यापीठ अंतर्गत आसपासच्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या महोत्सवात सहभागी व्हावे असे आव्हान विद्यार्थी विकास मंडळ व श्रीरामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालया कर्मचारी यांनी आवाहन केले आहे,