मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पेरणे ग्रामस्थ महिला भगिनी यांनी पेरणे फाटा येथे आज रविवार दी. 29/10/2023 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले होते,
सदर उपोषणाची सुरुवात पेरणे गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली उपोषणासाठी पेरणे गावचे सरपंच उषाताई वाळके, उपसरपंच सारिका वाळके ,सर्व ग्रामपंचायत सदस्य ,वि का सो चेअरमन मधुकर वाळके .युवक वर्ग, शेतकरी बांधव इतर असे 250 ते 300 लोक उपस्थित होते.
उपस्थित पैकी बऱ्याच जणांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचा समारोप शिवाजी महाराजांची आरती करून व राष्ट्रगीताने करण्यात आला.कार्यक्रमाच्या आयोजन माधुरी नवनाथ वाळके, सुनिता वाळके, कल्पना जगन्नाथ वाळके सदस्य ग्रामपंचायत पेरणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
