श्री व्यंकट ढोपरे वय वर्ष 60 रा. नेरे आंबेगाव मुळगाव उंबरदरा ,लातूर असे आत्महत्या केलेले व्यक्तीचे नाव आहे .आत्महत्या करताना सदर व्यक्तीने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. मुलाला मराठा आरक्षण नसल्याने नोकरी लागत नाही तसेच अनुकंपावर नोकरी मिळत नाही या नायरशातून सदर वृद्ध व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलले आहे. नरे आंबेगाव येथे ते सध्या राहत असून काल दर्शनासाठी ते आळंदीला आले होते. काल अकरा वाजता नरे आंबेगाव येथून ते आळंदी साठी निघाले होते घरातील व्यक्तींना त्यांची त्याबाबत चिट्ठी आढळून आली त्याची मध्ये मी सरपंच असल्यापासून प्रयत्न करतोय मुलाला अनुकंपावर नोकरी लागत नाही सरकार गांभीर्याने घेत नाही 2012 सालापासून ही मुलाच्या नोकरीसाठी केलेल्या प्रयत्नामध्ये असफल झाले या कारणास्तव मी आत्महत्या करत आहे असा उल्लेख असल्याचे समजते रात्री आठच्या सुमारास आळंदी इंद्रायणी नदीवर त्याबाबत शोध मोहीम चालू करण्यात आली रात्री उशिरापर्यंत पिंपरी चिंचवड अग्निशामक दल आळंदी व्यवस्थापन समिती आळंदी पोलीस स्टेशन पोलीस दल या मार्फत इंद्रायणी नदीच्या सर्व बाजूने झाडा दळती घेत तपासणी करण्यात आली परंतु मृतदेह काही आढळला नाही मात्र आज दिनांक 28 रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारात जुन्या बांधाऱ्यांमध्ये हातपाय बांधल्याच्या अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला व्यंकटोपरे यांना पोहायला येत होते त्यामुळे स्वतःचे हातपाय बांधून त्यांनी आत्महत्या केली असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे,
