शिरूर विशेष प्रतिनिधी
ब्रिटानिया न्युट्रीशन फाऊंडेशन स्वस्थ भारत परियोजना .. एक पाऊल कुपोषण मुक्त भारताकडे… पोषण महिना एक ते तीस सप्टेंबर या उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेमकर वस्ती( तालुका शिरूर ) या शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यामध्ये स्कूल बॅग, वह्या , कंपास व इतर साहित्य देण्यात आले.
शालेय विद्यार्थी कुपोषित राहू नये यासाठी आम्ही काम करत असून त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.कंपनीकडून शालेय साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थी भारावून गेले होते. विद्यार्थ्यांनी कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत केले. मुख्याध्यापक विकास उचाळे आणि सहशिक्षक गहिनीनाथ सानप यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांचे स्वागत आणि आभार मानले.
यावेळी ब्रिटानिया न्युट्रीशन फाऊंडेशन प्रकल्प समन्वयक डॉक्टर देबरून पॉल,सहायक समन्वयक दयानंद टेकाळे, अपर्णा ताठे, तेजस्विनी म्हस्के टाकळी हाजी चे सरपंच अरुणाताई घोडे , निवृत्त अंगणवाडी सेविका जुलेखा सय्यद , माजी सैनिक संभाजी पवळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पत्रकार साहेबराव लोखंडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दादाभाऊ करकंडे, अक्षय वरखडे, प्रशांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

