March 30, 2026
शिरूर विशेष प्रतिनिधी 
        एसटी महामंडळाची पुणे ते पारगाव ही बंद असलेली बससेवा पुणे ते बेल्हे अशी सुरू करण्याची मागणी एसटी महामंडळाचे पुणे विभागीय नियंत्रक श्री रमाकांत गायकवाड यांच्याकडे आमदार अतुल बेनके यांनी केली आहे  

आमदार अतुल बेनके यांनी विभागीय नियंत्रक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एसटी महामंडळाची पुणे ते पारगाव अशी शिरूर आगाराची बससेवा अनेकदा वर्षापासून पारगाव ता.जुन्नर मुक्कामी येथून सुरू होती परंतु कोविड दरम्यान सदर बससेवा बंद करण्यात आली. सदर एसटी बससेवा बंद केल्याने बेल्हे, पारगाव ता.जुन्नर पिंपरखेड, जांबुत, वडनेर खुर्द, टाकळी हाजी, आमदाबाद, मलठण, वाघाळे, गणेगाव खालचा, बुरुंजवाडी शिक्रापूर या परिसरातील नागरिक व विद्यार्थी, कामगार वर्ग यांची मोठी गैर सेव होत आहे अनेक वर्षापासून नियमितपणे सुरू होती तसेच शिरूर आगारामार्फत पुणे- पारगाव व शिरूर – बेल्हा ही बससेवा सुरू होत्या परंतु कोविडच्या काळात दोन्ही बससेवा बंद करण्यात आल्या त्या आज अखेर बंदच असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी म्हटले आहे 

    पुणे पारगाव बस संध्याकाळी शिवाजीनगर येथून सुटून मुक्कामी पारगाव ता.जुन्नर येथे येत असत व सकाळी पारगाव टाकळी हाजी मलठण मार्गे शिक्रापूर वरुन पुणे येथे जात परंतू सध्या या गावांमधून पुणे येथे जाण्या-येण्या साठी एकही बससेवा सुरू नसल्याने परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पुणे -शिक्रापूर- मलठण – टाकळी हाजी – जांबुत – पिंपरखेड – पारगाव बेल्हे अशी बससेवा सुरू करण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली आहे