March 30, 2026
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे 
           स्व. सुभाष जिजाराम इंगळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगळेनगर (ता. शिरुर) येथे  वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी माजी सरपंच काळूराम पुणेकर , माजी उपसरपंच तुकाराम कुलाल,  सखाराम इंगळे, अर्जुन इंगळे, नागेश कुलाल, सतीश इंगळे, विशाल इंगळे, तुषार कुलाल, बोरुडे सर, शरद इंगळे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक व विदयार्थी उपस्थित होते.     

यावेळी फणस, आवळा, चिंच, कवठ, चिक्कू, जांभूळ, पेरू, सीताफळ आदी फळझाडांची लागवड करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना बारमाही वेगवेगळी फळे उपलब्ध व्हावीत व त्यातून मुलांना वेगवेगळी जीवनसत्त्वे सहज उपलब्ध होतील. परिणामी लहान मुलांच्यात असणाऱ्या जीवनसत्त्वे कमतरता नाहीशी होईल. व मुलांचे आरोग्य सुधारेल अशी माहिती वृक्षारोपण करताना शरद इंगळे यांनी दिली.