March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
             शिरुर तालुकास्तरीय ऑन लाईन विज्ञान प्रदर्शनात संग्राम इरोळे, अपेक्षा जाधव, संभाजी ठुबे व सत्यजीत गरुड यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, राज्य विज्ञान संस्था नागपूर, पुणे जिल्हा परिषद व शिरुर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिरुर तालुकास्तरीय ऑन लाईन विज्ञान प्रदर्शन स्पर्धेचा शैक्षणिक वर्ष  २०२१-२२ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी दिली. विज्ञान प्रदर्शनातील विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे :- *उच्च प्राथमिक ६ वी ते ८ वी विद्यार्थी गट :-* प्रथम :- संग्राम एकनाथ इरोळे – विद्याधाम प्रशाला शिरुर (सेव्ह इलेक्ट्रिसीटी – स्ट्रीट लाईट), द्वितीय :- भावना बाळासाहेब चव्हाण – समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय तळेगाव ढमढेरे (चेअर वूइथ बॅग), तृतीय :- सोहम सागर पंडीत – स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे (टी ट्रॅव्हलर). *उच्च प्राथमिक ९ वी ते १२ वी विद्यार्थी गट :-* प्रथम :- अपेक्षा भाऊ जाधव – शिवाजी विद्यालय गोलेगाव (फ्लोटिंग हऊस), द्वितीय :- समृद्धी बाबासाहेब चव्हाण – माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी (पाऊस सूचक यंत्र), तृतीय :- नेहा राजू गिरी – छत्रपती संभाजी हायस्कूल कोरेगाव भीमा (फॅक्टरी वर्कर अल्कोहोल डिटेक्टर). *माध्यमिक शिक्षक गट शैक्षणिक साहित्य :-* प्रथम :- संभाजी तबाजी ठुबे – माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी (पेशी विभाजन), द्वितीय :- विजय वरपे – श्री संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जातेगाव बुद्रुक (भौतिकशास्त्रातील मूलभूत तत्व). *प्रयोगशाळा परिचर गट शैक्षणिक साहित्य :-* प्रथम :- सत्यजीत गरुड (प्रयोगशाळेतील काचेची उपकरणे स्वच्छ करणे).