March 30, 2026

सुनील भंडारे पाटील

            पुणे नगर रस्त्याचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे काम धिम्या  गतीने का होईना परंतु पूर्ण झाले, पुणे शहराकडे जाणाऱ्या – येणाऱ्या एकूण सहा लेन झाल्याने तसेच स्पीड बेकर व इतर कुठलाही अडथळा  नसल्याने वाहने सुसाट धावत आहेत परिणामतः लहान-मोठे अपघाताला निमंत्रण मिळत आहे    

शिक्रापूर पासून वाघोली साई सत्यम पार्क या अंतरामध्ये वाघोली, लोणीकंद, पेरणे, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर ही महत्त्वाची गावे, तसेच या गावांना जोडणारी आसपासची अनेक गावे, संबंधित रहदारी, दळणवळण,वाहतूक पुणे नगर महामार्गावर अतिशय गर्दी असते,

रस्त्याचे काम स्टार झाल्याने, दुचाकी, चारचाकी, इतर मालवाहतूक वाहने, पब्लिक बसेस, यांचा अतिवेग, महत्त्वाच्या गावांमध्ये ( चौक) सिग्नलचा अभाव परिणामीगाने वाहने धावत आहेत त्यामुळे अनेक छोट्या मोठे अपघात होत असून, गेल्या महिन्याभरात अनेक अपघाती मृत्यू झाले आहेत, संबंधित महामार्गावर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई होण्याची गरज आहे, तसेच चालकांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लावणे गरजेचे आहे,

महामार्ग लगत असणाऱ्या महत्त्वाच्या गाव चौका चौकामध्ये सिग्नल बसवण्याची गरज आहे, तसेच दाट रहदारी,दळण – वळण, रस्ते गावांना जोडणारे फाटे अशा ठिकाणी मागेपुढे गतिरोधक बसवणे, ठीक ठिकाणी पोलीस चे पोस्ट लावणे यामुळे लहान मोठ्या अपघातावर नियंत्रण राहील, तसेच बेशिस्त वाहन चालकांना आळा बसेल,