March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
    धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची बलिदान भूमी तुळापुर  व समाधी स्थळ वुढु ब्रु॥ येथील समाधी स्थळ विकास आराखडयासाठी महाराष्ट्र शासनाने 397 कोटी रुपये मंजुर केले म्हणुन आज तुळापुर येथे समाधीस्थळी तुळापुर ग्रामस्थ व पालखी सोहळा समितीच्या वतीने फटाके वाजवून आंनोदोत्सव साजरा करण्यात आला.   

   तुळापुर गावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवले यांनी विकास आराखडयासाठी पाठपुरावा केला म्हणुन माजी खासदार शिवाजीराव आढळराव,  पीडीसीसी चे संचालक प्रदीपदादा कंद यांचे आभार मानले तसेच विकास आराखडा मंजुर केला म्हणुन महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. 

        या प्रसंगी भाजपा हवेली अध्यक्ष पै.संदीप भोंडवे , पुणे जिल्हा विद्यार्थी संघटना अध्यक्ष अमोल शिवले , शिवसेना हवेली तालुका प्रमुख   विपुल शितोळे ,  गणेशराव कुटे , संदीप सातव , विजय जाचक , उपसरपंच राजाराम शिवले, मा.उपसरपंच पवन खैरे,मा.सरपंच माऊलीदादा शिवले , मा.चेअरमन राजुनाना शिवले,संपत शिवले,मा.सरपंच रंगनाथ शिवले,नवनाथ शिवले,मा.तंटामुक्ती उपाध्यक्ष अनिल शिवले,किसन पुजारी , शरद आव्हाळे , प्रदीप सातव , दशरथ वाळके , भाऊसाहेब शिंदे , संतोष गायकवाड,  राजु कंद , नवनाथ दाभाडे , सुजय वाळके व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.