सुनील भंडारे पाटील
जीव लावणाऱ्या मालकावर प्रेम करणारी मुकी जनावरे आपण आजवर अनेक पाहिली आहेत, परंतु मुक्या जनावरावर प्रेम करणाऱ्या मालकाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर या घटनेचा शोक मुक्या जनावरांना किती होतो, हे आपल्याला या व्हिडिओवरून समजेल,
जगाचा पोशिंदा समजले जाणाऱ्या बळीराजाच्या जीवनामध्ये यात्रा जत्रा मधील बैलगाड्याचा घाट असो किंवा शेती मशागतीसाठी शेतकऱ्याचा जवळचा समजला जाणारा बैल या प्राण्याची जवळीक खूप आहे, पुरातन काळापासून सद्यस्थिती पर्यंत बळीराजाला बैलाची साथ कुटुंबातील सदस्य प्रमाणे मिळाली आहे, पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावणाऱ्या बळीराजाची व बैलाची कहाणी सख्या नात्याप्रमाणे आहे,
सदर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला असून, कुठलचा आहे काही माहिती नाही, परंतु आपला धनी गेल्यानंतर या मुक्या जनावराला देखील शोक आवरला नाही, त्याच्या भाषेतून त्याने आपल्याला झालेले दुःख कसे व्यक्त केले हा व्हिडिओ नक्की पहा, डोळ्यांना अश्रू आल्या शिवाय राहणार नाहीत,

