दहिवडी प्रतिनिधी
तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवीतील 89 विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव ढमढेरे या ठिकाणी भेट दिली शालेय विद्यार्थ्यांना शाळाबाह्य उपक्रमामध्ये ग्रामपंचायत हा अभ्यासक्रम शाळेच्या वतीने समाविष्ट करण्यात आलेला आहे
विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत ची माहिती व्हावी व ग्रामपंचायतचा कारभार कसा चालतो, ग्रामपंचायत कोणकोणती कामे करते,ग्रामपंचायतचे प्रशासन कसे चालते याविषयी माहिती व्हावी या दृष्टिकोनातून या ग्रामपंचायत कार्यालयास भेटीचे आयोजन केलेले होते अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी दिली
यावेळी तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बाळू बबन गोरे, बाळासाहेब लांडे भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड उपाध्यक्ष भारत सरकार, ग्रामपंचायत सदस्य सचिन ढमढेरे उपस्थित होते. तसेच ग्रामविकास अधिकारी बाळू गोरे यांनी ग्रामपंचायतीचे संपूर्ण माहिती दिली यामध्ये ग्रामपंचायतीचा इतिहास,ग्रामसभेची बैठक, ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्य, ग्रामपंचायत उत्पन्नाची साधने, निवडणुकीची रीत,मतदारांची यादी,सरपंचाची निवडणूक, सरपंचाचे अधिकार व कर्तव्य, सदस्य व सरपंचांचा राजीनामा, अविश्वासाचा प्रस्ताव, ग्रामसेवकाची कर्तव्य आदी सर्व विषयांची माहिती सखोलपणे विद्यार्थ्यांना दिली वरील दिलेल्या परिपूर्ण माहितीबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच वैष्णवी गायकवाड या विद्यार्थिनीने मी सरपंच होणार आहे व सार्थक नरके याने मी ग्रामविकास अधिकारी होणार असल्याचे सांगितले सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने खाऊवाटप करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन आदेश गारगोटे व गणेश मांढरे यांनी केले होते विद्यार्थ्यांनी तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बाळू गोरे यांना विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सखोलपणे उत्तरे दिल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण होते. या उपक्रमाचे कौतुक ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ व अध्यक्षा मंगल भुजबळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

