March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
             धर्मपीठ, शक्तीपीठ, प्रेरणापीठ श्रीक्षेत्र वढु बुद्रुक (तालुका शिरूर) येथील धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाच्या नवीन विकास आराखड्यासाठी सुमारे 397 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याने समाधी स्थळी पेढे वाटून, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला,          

  गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नाला वढू बुद्रुक ग्रामस्थांना यश आल्यामुळे समाधी स्थळ तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेना, संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर शंभूराजे समाधी स्थळाचा विकास यासाठी राज्य शासन प्रयत्नशील होते, माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून नवीन आराखडा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समोर काल 14 तारखेला सादर करण्यात आला होता, 384 कोटी  रुपये अंदाजे रक्कम असणारे या आराखड्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेत वाढीव निधी करत सुमारे 397 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, राज्य शासनाच्या या निर्णयाबद्दल वढू बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने धर्मवीर शंभूराजे समाधीस्थळी हार फुले पूजन करण्यात आले, शंभू वंदना घेण्यात आली, धर्मवीर शंभूराजे नावाने जोरदार घोषणाबाजी झाली, गावात पेढे वाटून तसेच फटाक्यांच्या आतषबाधित आनंद उत्सव साजरा करण्यात आला,        

   राज्य शासनाकडून समाधी स्थळाचा विकास करण्याचे काम 14 मार्च रोजी भूमिपूजन समारंभ जाहीर करण्यात आला होता,परंतु येत्या 21 मार्चला धर्मवीर शंभूराजे बलिदान दिन असल्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून लाखो शंभू भक्तांच्या उपस्थितीत समाधी विकास कामाचे भूमिपूजन व्हावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे, यावेळी भगवान शेळके, जयेश शिंदे, आबा सोनवणे,सोमनाथ दादा भंडारे, लक्ष्मण भंडारे,सचिन भाऊ भंडारे, अनिल दादा भंडारे,रामभाऊ सासवडे, हरिभाऊ भंडारे,घनश्याम शिवले, विठ्ठल आरगडे, संजय भंडारे,मनोहर भंडारे, धर्मवीर शंभूराजे स्मृती समिती, संभाजी राजे युवा मंच, समस्त ग्रामस्थ पंचक्रोशी, जयसिंग भाऊ भंडारे अध्यक्ष पोलीस पाटील संघटना, आजी-माजी पदाधिकारी पंचक्रोशी तरुण  वर्ग व अन्य मोठ्या संख्येने उपस्थित होते,