March 30, 2026
सणसवाडी प्रतिनिधी 
         हभप पांडुरंग महाराज घुले यांचे श्रीकृष्ण चरित्र लीलापर कीर्तनाने सणसवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली . 

 घुले महाराज , गोपाल समिंदर , उतरेश्वर पुरबे , आळदीकर गायक व भजनी मंडळींचा दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदिनाथ हरगुडे ,माजी सभापती आनंदराव हरगुडे ,माजी सरपंच नवनाथ हरगुडे , दतात्रय हरगुडे ,माजी उपसरपंच शिवाजी दरेकर ,संभाजी साठे ,नवनाथ हरगुडे, माजी चेअरमन बापूसाहेब हरगुडे, शरद दरेकर , गोरक्ष भुजबळ व ग्रामस्थांचे हस्ते सन्मान करण्यात आला .

काल्याचा महाप्रसाद माजी सरपंच बाळासो नारायण हरगुडे व गोरखनाना भुजबळ यांनी दिला . हरीनाम सप्ताह मंडळाचे अध्यक्ष काळूराम हरगुडे , उपाध्यक्ष निवृती सोनबा  हरगुडे, देवचंद हरगुडे , रामदास हरगुडे यांना सप्ताहाचे व्यवस्थीत नियोजन केले . सप्ताहभर किर्तन , प्रवचन, गाथा पारायण हरीपाठ, भजनाचा जागर असे आयोजन होते . काल्याचे महाप्रासादाने सप्ताहाची सांगता झाली,