धर्मपीठ, शक्तिपीठ, प्रेरणापीठ, श्रीक्षेत्र वढू बुद्रुक – तुळापूर येथे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाने पवित्र झालेली माती, तसेच भीमा,मामा, इंद्रायणी संगम आजही धर्मवीर शंभूराजांच्या धकधकता इतिहास लोकांच्या डोळ्यासमोर आणत आहे, ज्यांना धर्मवीर शंभूराजे यांचा इतिहास माहिती नाही त्यांनी येथील समाधी स्थळी अवश्य नतमस्तक होऊन इतिहास जाणून घ्यावा, जगाच्या पाठीवर एकच राजा असा होऊन गेला की, ज्या राजाने 40 दिवस, प्रत्येक दिवस मरण यातना सहन करून धर्मासाठी बलिदान दिले, परंतु राजकारणात लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी धर्मवीर शंभूराजांना देखील सोडले नाही, परंतु वढू बुद्रुक, तुळापूर, संपूर्ण हिंदुस्थानातील जनता यांना धर्मवीर शंभू राजांचा इतिहास अवगत असल्याने राजकारण्यांनी स्वतःची चेष्टा करून घेतल्याचे वातावरण सध्या तयार झाले आहे, वाडवडिलांनी तसेच पूर्वजांनी दिलेल्या शंभुराजेंच्या ” धर्मवीर ” या उपाधीवर जनता ठाम आहे,

