March 30, 2026
आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
            तीर्थक्षेत्र आळंदी येथे आज अजा एकादशीनिमित्त भाविक व वारकरी यांची गर्दी होती. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात भाविक भक्तांनी दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या. एकादशी रविवार आणि श्रावणी सोमवार आतील शेवटचा दिवस या त्रिवेणी संगमामुळे भाविक भक्तांचा भक्तीची लाट आळंदी कडे वळली होती.

    विठू माऊलीचा गजर करत न्यानोबा तुकोबाची जय घोषणा भगवी पताका खांद्यावर घेत प्रदक्षिणा मारताना जागोजागी भाविक वारकरी दिसत होते. मंदिर परिसरात तर कार्तिकी वारीचे वेळी असणाऱ्या गर्दीचा अनुभव येत होता. इतक्या मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी रात्रीचे सुमारे अकरा वाजले तरी ओसरण्याचे नाव घेत नव्हती. आळंदीतील सर्व धर्मशाळांमध्ये भक्ती भजन रात्री उशिरापर्यंत चालू होते . मंदिर परिसरातील हॉटेलमध्ये फराळी चिवडा शेंगदाणे साबुदाणा,साबुदाणा वडे एकादशी निमित्त असलेल्या फळांची मोठ्या प्रमाणात रेलचेल होती,

          मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक भक्त एकादशी निमित्त असणाऱ्या फराळाचं सेवन करत होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिरामध्ये दर्शन बारी दर्शन बारीच्या रांगेतून दर्शन घेऊन बाहेर पडत असताना वारकरी भाविक भक्तांना खिचडीचे मोफत वाटप दारातच करण्यात येत होते. चला आळंदीला जाऊ ज्ञानदेव डोळा पाहू या भक्तीचे उत्कंठा गगनाला मावताना दिसली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटी यांच्याकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविक ,भक्त ,महिला, अबाल वृद्ध. यांना सुलभ दर्शन व्हावं याची व्यवस्था बजावत असल्याची माहिती देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली. इंद्रायणीचे दोन्ही तट भाविक भक्तांनी भरून गेले होते आणि भक्तांची मांदळी ज्ञानोबा तुकोबारायाचा गजर आणि गर्दीने फुलून गेलेला इंद्रायणी घाट पाहून डोळे दिपून जात होते.