माणुसकीला कालीमा फासणारी तसेच संपूर्ण राज्याला हादरून टाकणारी घटना नगर जिल्ह्यामधील कोपर्डी या ठिकाणी घडली होती, जितेंद्र शिंदे या नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याने लोकांच्या भावना खूप दुखावल्या होत्या, मराठा क्रांती मोर्चा मधून देखील या घटनेचे प्रतिसाद उमटले होते,
संबंधित आरोपीला भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी देखील केली होती, संबंधित प्रकरणामधील आरोपी जितेंद्र शिंदे हा येरवडा कारागृहामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना आज अचानक त्याने कारागृहातच गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे, घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी यांनी पाहणी केली असता या आरोपीचा मृतदेह पहाटेच्या सुमारास आढळून आला, कारागृहामध्ये एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे आत्महत्या याची सर्वत्र चर्चा चालू आहे,
