ऐन पावसाळ्याचे दिवस त्यात संबंधित विद्युत रोहित्र अचानक जळाल्याने ग्रामस्थांची व नागरिकांची खूपच गैरसोय झाली होती, मोठी रहदारी त्यात विद्युत रोहित्र जळाल्याने घरात अंधार, शिवाय शेतीपंप बंद, सार्वजनिक पाणीपुरवठा बंद,यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते, याबाबत नागरिकांनी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित आप्पा दरेकर यांना संपर्क साधत समस्या सांगितले असता, दरेकर यांनी तातडीने आमदार पवार यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली, नागरिकांची समस्या पाहून आमदार पवार यांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी नितीन महाजन यांना ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्याची सूचना केली, अधिकाऱ्यांनी याची दखल घेत दोन दिवसात विद्युत रोहित्र बदलले, त्यामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त करत आमदार पवार, पंडित आप्पा दरेकर, महावितरण अधिकारी महाजन यांचे आभार मानले,
